लोकसभा निवडणुका जवळच आलेल्या असताना अनेक नेते पक्ष प्रवेश करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. नुकतेच अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला.
कोल्हापूर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. धक्कातंत्र पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये, असं सूचक वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
जिल्ह्यातील काही एकनिष्ठ भविष्यात भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तीला आपले भवितव्य भाजपमध्ये असल्याचं वाटू लागलंय. त्यामुळे भाजपकडे ओढ लागली असून रोज शेकडो जणांना प्रवेश मिळत आहे, असे महाडिक म्हणाले.