22 जानेवारी दिवशी अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठित केली जाणार आहे. या दिवशी सार्याच रामभक्तांना अयोद्धेमध्ये येणं शक्य नाही. त्यामुळे या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी घरच्या घरी रामभक्तांनी संध्याकाळी ‘राम ज्योती’ प्रज्वलित करण्याचं आवाहन केले आहे.
दुपारी 12.30 ते 1 दरम्यान मृगशीर्ष नक्षत्राच्या मुहूर्तावर रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल आणि 23 जानेवारीपासून हे मंदिर राम भक्तांना दर्शनासाठी खुलं असेल.