सीपीआर आवारातून धारदार तलवार, दुचाकी हस्तगत

शासकीय (सीपीआर) रुग्णालय आवारात रुग्णांसह नातेवाईकांची सतत वर्दळ असलेल्या दूधगंगा इमारतीसमोर बेवारस स्थितीत धारदार तलवारीसह दुचाकी आढळल्याने पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली.

या घटनेनंतर खबरदारी म्हणून पोलिसांचा फौजफाटा पाचारण करण्यात आला. रात्री उशिरा कोडोली (ता. पन्हाळा) येथील दोन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.संशयित तरुणांनी धारदार तलवार रुग्णालय आवारात कोणत्या कारणासाठी आणली होती.

पांढर्‍या रंगाच्या पिशवीतगुंडाळून तलवार दुचाकीवर ठेवण्याचा हेतू काय, याचीही सखोल चौकशी सुरू आहे. रुग्णालय परिसरात दहशत माजविण्याचा तरुणांचा हेतू असावा का, याचीही माहिती घेण्यात येत आहे, असे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद कवठेकर यांनी सांगितले.