गुगल बिझनेस प्रोफाईलचा वापर करून तयार करण्यात आलेल्या वेबसाईट्स बंद करणार असल्याची घोषणा गुगलने नुकतीच केली आहे.कंपनीने यासाठी मार्च ते 10 जून पर्यंतची डेडलाइन दिली आहे.
गुगलने आपल्या एका अधिकृत ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, मार्च 2024 मध्ये बिझनेस प्रोफाइलने बनलेल्या वेबसाइट्स बंद केल्या जातील आणि त्याऐवजी आपल्या साइटला भेट देणाऱ्या युजर्सना तुमच्या बिझनेस प्रोफाईलवर रिडायरेक्ट केले जाईल. आधी जाणून घेऊया गुगल बिझनेस प्रोफाईल म्हणजे काय?गुगलचे बिझनेस प्रोफाइल हे एक Free tool आहे जे यूजर्सना गुगल सर्च आणि मॅप्सवर त्यांचा व्यवसाय करण्याची संधी देते.
अनेक व्यावसायिक याचा आपला व्यावसाय वाढवण्यासाठी वापर करत असतात. व्यावसाय वाढवण्यासाठी माहिती पोस्ट करु शकतात आणि आपल्या ग्राहकांशी कनेक्ट होऊ शकतात. अनेकजण सध्या ऑनलाईन व्यावसायाकडे वळले आहेत. त्यामुळे लहान व्यावसायांनादेखील यामुळे फायदा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बदलाचा परिणाम त्या वेबसाइट्सवर होणार आहे ज्यांचे यूआरएल Business.site आणि negocio.site वर संपते. ते अपडेट करण्यासाठी सध्या तुमच्याकडे आणखी दोन महिन्यांचा अवधी आहे.जर युजर्सने 10 जूननंतर एखाद्या बिझनेस प्रोफाइल वेबसाइटला भेट दिली तर आपल्याला ते दिसणार नाही आहे.
गुगलने आपल्या एका फिचरमधील अनेक फीचर्स गुगल असिस्टंट बंद केले आहेत. जवळपास सर्व अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये गुगल असिस्टंटला सपोर्ट आहे, पण युजर्स गुगल असिस्टंटची बहुतांश फिचर्स वापरत नाहीत आणि त्यामुळे गुगलने अशी फिचर्स गुगल असिस्टंटमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. Google Assistant मधून एकूण 17 फीचर्स काढून टाकण्यात आले आहेत.