राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट!

राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट (Rain Alert) असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देशासह राज्यात जोरदार थंडीची लाट पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. उत्तर भारतासह महाराष्ट्रातही थंडीचा जोर पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढला असताना राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात येत्या काही दिवसात थंडीचा जोर ओसणार असून पावसाची शक्यता (Unseasonal Rain) आहे.

महाराष्ट्रातही आता गारठा वाढू लागला आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यातील थंडीसाठी (Winter) पोषक ठरत आहेत. मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासांत तापमानात घट होणार आहे. पुढील दोन दिवसात राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. गेल्या दोन दिवसात मुंबई, ठाण्यातही तापमानात मोठी घट झाली आहे. शनिवारी मुंबई मध्ये 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.विदर्भात येत्या काही दिवसात हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याचं अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. गडचिरोली  आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.नाशिक शहरासह (Nashik) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड (Winter) घट झाली आहे. यामुळे नाशिककर चांगलेच गारठले आहेत. सकाळी हाडं गोठवणारी थंडी तर दुपारी कडक उन्हाचा चटका नाशिककरांना बसत आहे. लासलगावसह (Lasalgaon) निफाड तालुक्यात थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. गेल्या 15 दिवसात राज्यासह नाशिक  आणि निफाडमध्ये तापमानात चढउतार पाहायला मिळत आहे.

मधील काळात ढगाळ वातावरणामुळे थंडीच्या प्रमाणात काहीशी घट झाली होती. पण आता पुन्हा थंडी पुन्हा वाढली आहे. हरभरा, गहू या पिकांना जरी या थंडीचा फायदा होत असला तरी मात्र या थंडीने फळबगांसह द्राक्षपिकांच्या वाढीवर याचा परिणाम होत आहे. यामुळे द्राक्षांची वाढ मंदावण्याची शक्यता असल्यामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत.