११११ किलोचा राम लाडू! २२ जानेवारीला होणार प्रसाद स्वरूपात वाटप

अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळत आहे. (Nagpur) सगळीकडचे वातावरण राममय झाले असून घरोघरी, मंदिरात जोरदार तयारी सुरु असून नागपुरात एका रामभक्ताने १ हजार १११ किलोचा रॅम लाडू प्रसाद म्हणून अर्पण केला.

अयोध्येत (Ayodhya) २२ जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. रामाच्या स्वागतासाठी संपूर्ण देशभरात जय्यत तयारी सुरु आहे. ठिकठिकाणी कलश यात्रा, स्वागत यात्रा काढल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणात रामभक्त उपक्रमात सहभागी होऊन उत्सव साजरा करत आहे. यासोबत महिलांनी सुद्धा आपला आनंद फेर धरून व्यक्त करताना दिसून येत आहेत.

प्रत्येक मंदिरात स्वच्छता करून भगवा ध्वज लावले जात आहेत. मुख्य म्हणजे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने काही प्रसादाचे देखील आयोजन केले आहे. अशाच प्रकारे नागपुरातील रामभक्ताने लाडूचा प्रसाद अर्पण केला आहे.नागपुरातील एका राम भक्ताने ११११ किलोचा राम लाडू प्रसाद स्वरूपात अर्पण केला.

लक्ष्मण पोटे असे या रामभक्ताचे नाव आहे. पोटे यांनी कळमना परिसरातील राम मंदिरात ११११ किलोचा लाडू बनवून श्रीरामाला अर्पण केलाय. हा लाडू मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद स्वरूपात वितरण केले जाणारआहे.