इचलकरंजीत वस्त्रोद्योग वाढीसाठी सवलतीची मागणी…..

इचलकरंजी वस्रोद्योग नगरी म्हणून ओळखली जाते. परंतु उद्योजकांना अनेक अडचणीचा सामना देखील अलीकडच्या काळात करावा लागतो आहे. त्यामुळे यंत्रधारक खूपच हतबल देखील झाले आहेत. तर वस्त्रोद्योगातील समस्या सोडविण्यासाठी उद्योजकांना विविध सवलती द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन शिवसेनाप्रणित महाराष्ट्र यंत्रमागधारक सेनेचे राज्याध्यक्ष नंदकुमार लोखंडे यांनी नामदार दादा भुसे यांना दिले. सद्या यंत्रमागधारकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अशा यंत्रमागधारकांना नवसंजीवनी देण्याकरिता वस्त्रोद्योग धोरणामध्ये प्रतियंत्रमाग २५ हजाराचे अनुदान द्यावे.

यंत्रमागावर उच्च दर्जाचे कापड निर्मितीसाठी लागणारे पूरक यंत्रसामुग्री बसविण्यासाठी ५० टक्के सबसिडी व शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन द्यावे, वीजदर प्रति युनिट एक रुपये किंवा प्रति यंत्रमाग आठशे रुपये करावा, २७ एचपीच्या आतील व २७ एचपीवरील असा भेदभाव न करता एकच वीजदर असावा. सौरऊर्जा पॅनलसाठी ५० टक्के सबसिडी व उर्वरीत ५० टक्के कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करुन द्यावे आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या
आहेत.

याप्रसंगी आम प्रकाश आवाडे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, साधा यंत्रमागधारकांचे अध्यक्ष विश्वनाथ मेटे, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे चंद्रकांत पाटील, सतीश कोष्टी, राजगोंडा पाटील आदी उपस्थित होते.