२२ जानेवारीची सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. तो दिवस उजडण्यासाठी काहीच वेळ शिल्लक राहिलेला आहे. सगळीकडे भगवे झेंडे, केशरी साड्या, केसरी कुर्ता यासाठी मागणी खूपच वाढलेली आहे. इचलकरंजीतील महासत्ता चौक परिसरातील ३१ फुट शेपटीवर विराजमान असलेले श्री प्रभू रामाच्या नामस्मरणात तल्लीन असलेली १४ फुटी श्री मारूती मुर्तीचा अनावरण सोहळा सोमवार ता. २२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता खास. धैर्यशील माने यांच्या हस्ते तर माजी खास. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आम. प्रकाश आवाडे, दैनिक महासत्ताचे संपादक वसंतराव दत्तवाडे, माजी आम. सुरेश हाळवणकर, उद्योगपती सतिश डाळ्या, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, लक्ष्मी को-ऑप. प्रोसेसचे चेअरमन मुकूंद फाटक, माजी नगरसेवक सागर चाळके, संजय तेलनाडे, शिवसेना जिल्हा प्रमुख रविंद्र माने, खंजिरे इंडिस्ट्रिजचे अध्यक्ष राहुल खंजिरे आदि मान्यवर असणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास भावीक, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मारूती सेवा मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.