गावाच्या उज्वल भविष्यासाठी अनेक प्रकारचे निधी हे सरकार कडून मंजूर केले जातात. असाच एक कोटी 54 लाखांचा निधी वडगाव ते अमृत नगर फाटा रस्ता यासाठी मंजूर झाला. वाठार तर्फ वडगाव ते अमृत नगर फाटा या रस्त्याच्या दुरूस्ती कामाचे उदघाटन आ राजु बाबा आवळे यांचे हस्ते करण्यात आले. मोठी रहदारी पअसलेल्या या रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्यामुळे तात्काळ काही ठिकाणी काम करण्यात आले होतो. आता उर्वरित काम पूर्ण होणार आहे.
या कामासाठी 1 कोटी 54 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वैभव कांबळे, वाठारचे माजी उपसरपंच राहुल पोवार, मा. ग्रा. पं सदस्य जावेद कुरणे, महालक्ष्मी दूध संस्था चेअरमन आनंदा शिंदे उपस्थित होते.