मोठी बातमी ! LIVE प्रक्षेपणावर सायबर हल्ल्याचा धोका

उद्या होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याला देशविदेशातील व्हीआयपी उपस्थित राहणार आहे. हा सोहळा देशभर लाईव्ह दाखवला जाणार आहे. त्याचीही तयारी झाली आहे. मात्र, हा लाइव्ह प्रक्षेपणावर सायबर हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेश सरकार सतर्क झालं असून सरकारने सर्व विभागांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.अयोध्येत उद्या सोमवारी श्री राम मंदीराच उद्घाटन होणार आहे. यावेळी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळाही पार पडणार आहे.

अयोध्येच्या राम मंदिरापासून ते रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या कार्यक्रमाचं लाइव्ह प्रक्षेपण केलं जाणार आहे. टीव्ही, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवरून हे लाइव्ह प्रसारण होणार आहे. मात्र, असं असलं तरी या लाइव्ह प्रसारणावर सायबर हल्ल्याचा धोका आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावेळी सायबर हल्ला होणार असल्याने सरकारने अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.