राम मंदिराच्या दानपेटीत कोट्यवधी रुपयांचं दान

अयोध्या या ठिकाणी प्रभू राम तब्बल 500 वर्षानंतर राम गर्भगृहात विराजमान झाले आहेत. 22 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि थाटात प्रभू राम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

एकेकडे अयोध्या याठिकाणी प्रभू राण यांची प्राणप्रतिष्ठा होत होती, तर दुसरीकडे संपूर्ण भारतात उत्साहाचं आणि राममय वातावण झालं. अयोध्येत राम मंदिराची स्थपना करण्यासाठी फक्त भारतातून नाही तर, जगभरातून दार आलं आहे. भव्य मंदिराच्या उभारणीसाठी 1800 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी 1100 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती मिळत आहे. राम मंदिरच्या दानपेटीत देखील कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत.

अयोध्या याठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रभू राम मंदिर यांच्या दान पेटीत तब्बल 3200 कोटी रुपयांचं दान जमा झाल्याची माहिती मिळत आहे. अनेक उद्योजक आणि सेलिब्रीटींना राम मंदिरसाठी दान केलं आहे. पण सर्वात जास्त कोणी केलं असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल.अंबानी-अदानी किंवा टाटा समूहासारख्या मोठ्या उद्योगपतींनी राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी दिली असेल असं तुम्हाला देखील वाटत असले.

राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील कोट्यवधी लोकांनी, सेलिब्रिटींनी, उद्योगपतींनी, ऋषीमुनींनी देणग्या दिल्या. पण रिपोर्टनुसार सूरत याठिकाणी राहणाऱ्या एका उद्योजकाने मंदिरासाठी 101 किलो सोने दान केलं आहे.