अल्पावधीतच महाराष्ट्रातील कोट्यवधी भाविकांचेे श्रद्धास्थान व विदेही संत म्हणून ख्याती असलेल्या तालुक्यातील तीर्थक्षेत्र आष्टा येथील संत भिकाजीं महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्या सुरुवात झाली असून दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी होत आहे.
तालुक्यातील वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या संत भिकाजी महाराज देवस्थान हे महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे भक्तांचे श्रद्धास्थान ठरत आहे. विदेही संत भिकाजी महाराज यांचा जन्मोत्सव मागील अनेक वर्षांपासून साजरा केला जातो. 22 जानेवारी पासून या जन्मोत्सवाला सुरुवात झाली असून 29 जानेवारी पर्यंत हा उत्सव साजरा केला जात आहे.
यामध्ये कलश स्थापना करून दैनंदिन हरिपाठ, श्री ची आरती व भजन कीर्तनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहे.सात दिवसात कैलास महाराज लोखंडे यांचे सुमधुर सुरातून संगीतमय भागवत कथेला भाविकांची गर्दी वाढली आहे.यासोबत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.