कर्मवीर भाऊराव पाटील इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के

सन्मति एज्युकेशन सोसायटी संचलित, आष्टा येथील कर्मवीर  भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल शंभर  टक्के लागला. सलग १९ वर्षे विद्यालयाने शंभर टक्के निकालाची  परंपरा कायम राखली.

 विद्यालयातील यश प्रकाश माळी व सिद्धी दीपक नागणे या दोघांनीही ९८.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. पूर्वा प्रणव चौगुले हिने ९७.६० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक, स्नेहा सुहास पाटील व अंतरा भीमराव धनवडे या दोघींनीही ९७.२० टक्के गुण मिळवून तृतीय  क्रमांक पटकावला. तर सुमती सतिश चव्हाण, समृद्धी दिपक पाटील, श्रुतिका दीपक नवले या तिघींनीही ९६.०० टक्के गुण मिळवत चतुर्थ  क्रमांक पटकावला. अंजली किर्तीकुमार लोहार हिने ९४.२० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष डॉ. मनोहर कबाडे, सेक्रेटरी डॉ. दीपक लिगाडे,  हेडमिस्ट्रेस श्रीमती अरुणा उपाध्ये तसेच सर्व शिक्षक स्टाफ, शिक्षकेत्तर  कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.