आटपाडी येथे मुख्य व्यापारी पेठेतील रस्ता कामाचा प्रारंभ झाला. आटपाडी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी पेठ अतिक्रमण मुक्त ठेवण्याची मानसिकता ठेवावी त्यासाठी शहरासाठी 45 कोटींचा निधी दिला आहे.
पाणी योजनेसाठी 83 कोटीचा निधी उपलब्ध केला जाईल. आटपाडी नगरपंचायत महाराष्ट्रात एक नंबरला आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असे प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी केले आहे.
या रस्ता कामाच्या प्रारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील, रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, उपसभापती राहुल गायकवाड उपस्थित होते.
यावेळेस बाबर म्हणाले वीस कोटींचा निधी रस्त्यासाठी देण्यात आलेला आहे. तसेच अमरसिंह देशमुख म्हणाले आटपाडी शहराबाबत नवीन पिढीच्या काही अपेक्षा आहेत. सध्या टेंभूचे पाणी आले आहे त्याचे नियोजन व्हावे.