आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारे यांना भारतीय हवाई दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अतिविशिष्ट सेवापदक जाहीर केले. भंडारे हे आटपाडी येथील पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते प्रभाकर भंडारे यांचे पुत्र, तर पत्रकार प्रशांत सुहास भंडारे भंडारे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. भंडारे यांनी पुणे येथील सेव्हन टेट्रा स्कूलचे कमांडिंग ऑफिसर व पुणे येथील एअरफोर्स तळावर नाईन ‘बीआरडी’चे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. सध्या ते दिल्ली येथे सेवा बजावत आहेत. लवकरच राष्ट्रपती यांच्याहस्ते त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान केले जाणार आहे.
माणदेशातील आटपाडी या छोट्याश्या तालुक्यातील सुहास भंडारे यांनी हवाईदलात मिळालेल्या संधीचे चीज केले आहे. नियुक्ती झालेल्या कामाच्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. पुणे येथील सेव्हन टेट्रा स्कुलचे कमांडिंग ऑफिसर आणि पुणे येथील एअरफोर्स तळावर नाईन बी.आर.डी. चे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सध्या ते दिल्ली येथे सेवा बजावत आहेत. लवकरच राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते अति विशिष्ट सेवा बदक सुहास भंडारे यांना प्रदान केले जाणार आहे. आटपाडी येथील श्री भवानी विद्यालय, देशमुख महाविद्यालय आणि राजारामबापू हायस्कूल येथे त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. के.आय. टी.कॉलेज कोल्हापूरमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनियरिंग पदवी तर आय.आय.टी.खरगपूर येथून त्यांनी एम.टेक पूर्ण केले.