आज स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत. यानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.प्रजासत्ताक दिनाचे नेतृत्व राष्ट्रपती मुर्मू करणार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये झेंडावंदन पार पडलं आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांचं स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य अनेकांच्या बलिदानातून मिळालेलं आहे. अनेकांनी तुरुंगवास भोगला, रक्त जाळलं, त्यांच्या त्यागाचे स्मरण करतो. 75 वर्षाच्या वाटचालीत देशाने शेतीपासून उद्योगापर्यंत सगळ्यात प्रगती केली. अनेक देशात लोकशाहीला धक्के लागत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहिली ती म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे, असं अजित पवार म्हणाले.
75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज बुलढाणा येथे पोलीस कवायत मैदानात पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडल. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील पोलीस अधीक्षक सुनील कडासने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते उपस्थित होत्या. बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून मानवंदना स्वीकारल्यानंतर पालकमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त केल.
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंगोली मध्ये हिंगोली चे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे
हिंगोली शहरातील संत नामदेव कवायत मैदानावर हे ध्वजारोहण करण्यात आले असून या ध्वजारोहणाला सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे उपस्थिती होती हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे आणि आमदार संतोष बांगर यांची सुध्धा या ध्वजारोहण कार्यक्रमाला हजेरी होती.
पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण पुणे पोलिस ग्राऊंडवर हा कार्यक्रम संपन्न झाला.ठाणे महानगरपालिकेच्या भवन येथे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते. 75 वा प्रजासत्ताक दिन व प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापनदिन निमित्त ध्वजारोहण व राष्ट्रीय ध्वजवंदनाला मानवंदना देण्यात आले. त्यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी ,कर्मचारी आणि ठाणेकर उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बारामतीतील अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचं ध्वजारोहण पार पडलं. यावेळी विद्यार्थी शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र गीत देखील गायले गेले. खासदार सुप्रिया सुळे आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत.