कोल्हापुर गारठले, पारा सरासरीच्या खाली! धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम

प्रजासत्ताक दिनी शुक्रवारी पहाटे या महिन्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद शहरात झाली. पारा घसरल्याने कोल्हापूर शहर गारठले होते. यमुळे जिल्ह्यात धुकेही पसरल्याचे दिसून आले.त्याचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम जाणवला.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा खाली आल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी कोल्हापुरात पहाटेचे तापमान १३.५ अंश सेल्सियस होते.

गुरुवारी दुपारच्या तापमानाची नोंद २९ डिग्री अंश सेल्सियस होती. म्हणजेच दोन्हीही तापमान सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी होते. शहरातही चांगलीच थंडी जाणवत असून कोल्हापूर गारठले असे म्हणता येईल असे तापमान जाणवत आहे.जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये तापमानात घट दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवते आहे. कोल्हापुरात पहाटेचे किमान तापमान ११ ते १३.५ डिग्री सेल्सियस ग्रेड म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने कमी, दुपारचे कमाल तापमान २९ डिग्री सेल्सियस ग्रेड म्हणजे सरासरी पेक्षा २ डिग्रीने कमी होते.