अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. डिसेंबर महिन्यात अरबाज याने मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहे. पण आता मलायका – अरबाज यांच्या खासगी आयुष्याची नाही तर, त्यांचा मुलगा अरहान खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरहान याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
मलायका – अरबाज यांचा मुलगा अरहान खान अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी हिला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. दोघांचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अरहान आणि राशा स्वतःचा चेहरा लपवताना दिसत आहेत. दोघांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अरहान आणि राशा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे