केशवराव भोसले नाट्यगृह प्रकरण दाबण्याचा प्रयत्न….

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीची एफआयआरच महापालिकेने केलेला नाही. जळीत नोंद म्हणून पोलिसात नोंद करून एफआयआर झाल्याचे प्रशासन खोटे सांगत आहे. प्रशासनाचा हा खोटारडेपणा बुधवारी नाट्यगृह पुनर्बांधणी व संवर्धन समितीच्या शिष्टमंडळाने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासमोर उघड केला.

बैठकीत प्रशासनास एफआयआरची प्रत समिती सदस्यांना दाखवता आली नाही. म्हणून समितीचे सदस्य बाबा इंदूलकर यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या वास्तू मिटवण्यासाठी हे प्रकरण दाबले जात आहे. वरिष्ठांच्या दबावामुळेच एफआयआर होत नाही, असा आरोप केला.