अलीकडच्या काळामध्ये आपणाला अनेक क्राईमच्या घटना घडताना दिसत आहेत. अपघातांच्या प्रमाणात देखील भरपूर वाढ झालेली आहे. तसेच आपापसातील शत्रुत्व हे देखील जीव घेणे झालेले आहे. विटांमध्ये असाच जीवघेणी घटना घडलेली आहे. जर दारूचे दुकान सुरू ठेवायचे असेल तर आम्हाला हप्ता द्या अशी मागणी वडिलांकडे करणाऱ्यांनी सरपंच असलेल्या मुलावर कोयत्याने हल्ला केला.
आळसंदचे सरपंच अजित जाधव यांचे वडील जाधव यांचे विटा येथे साळशिंगे रस्त्यालगत सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. विट्यातील राहुल जाधव आणि सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील किशोर जाधव आणि त्याचा साथीदार विजय पाटील हे तिघे वेळोवेळी दुकानात येऊन दीड लाख रुपये हप्ता द्या नाहीतर दुकान ठेवा अशी धमकी देत होते .
गुरुवारी हे संशयित चारचाकीतून आले आणि त्यांनी हिम्मत जाधव यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देखील दिली. याबाबत हिंमत जाधव हे विटा पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले आणि त्यावेळी त्यांनी अजित जाधव यांना बोलावून देखील घेतले.
संशयीत्यानी अजित जाधव यांना दुकानाच्या बाहेर थांबवले व राहुलने कोयत्याने अजित यांच्या गळ्यावर वार केला. मात्र अजित यांनी तो वार चुकवला त्यानंतर अजित यांच्या मोडलेल्या पायावर पुन्हा लाथ मारून त्यांना खाली पाडले आणि मारहाण केली. याबाबत सरपंच अजित जाधव यांनी विटा पोलिसात तिघांविरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे.