प्रेमाच्या महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्टया

जानेवारी महिना संपला. आता फेब्रुवारी महिन्याला सुरवात झालेली आहे. प्रेमाचा महिना म्हणून फेब्रुवारी महिन्याचा रुबाब आहे. या महिन्यात आर्थिक व्यवहार करताना थोडी काळजी घेणेही आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसह अन्य कारणांमुळे तब्बल ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. शिवाय याच महिन्यात व्हॅलेंटाईन सप्ताहामुळे प्रेमोत्सवही साजरा होणार आहे.

सात फेब्रुवारी – रोज डे आठ फेब्रुवारी- प्रपोज डे नऊ फेब्रुवारी – चॉकलेट डे • १० फेब्रुवारी – टेडी बीअर डे • ११ फेब्रुवारी – प्रॉमिस डे • १२ फेब्रुवारी – हग डे • १३ फेब्रुवारी – किस डे • १४ फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे होणार आहे. लीप वर्षामुळे चार वर्षांनंतर यंदा फेब्रुवारी महिना हा २९ दिवसांचा असणार आहे.

फेब्रुवारी हा महिना इतर महिन्यांच्या तुलनेत कमी दिवसांचा असतो. अशात या फेब्रुवारी महिन्यात बँका ११ दिवस बंद असणार आहेत. त्यामुळे आधी बँकेच्या सुट्ट्यांची यादी पाहूनच व्यवहार करावे लागणार आहेत. फेब्रुवारीमधील सण आणि शनिवार व रविवारच्या सुट्ट्यांमुळे नऊ दिवस बँका बंद राहणार आहेत. दरम्यान, हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस असतील. काही राज्यांमध्ये १४ दिवस बँक बंद म्हणजे फक्त १५ दिवस बँका कार्यरत राहणार आहेत. रविवार दुसरा, चौथा शनिवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीमुळे सुट्ट्या राहणार आहेत.