अभिनेता नागाचैतन्य याने अभिनेत्री समंथा रुत प्रभूसोबत 2021 मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर त्याने आता दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. यामुळे नागाचैतन्य समंथाला विसरुन आयुष्यात पुढे गेला आहे, असं बोललं जात आहे.मात्र, नागाचैतन्य हा समंथाला विसरला नसल्यचं दिसत आहे. याचं कारण म्हणजे नागाचैतन्यने समंथाची निशाणी कायम ठेवली आहे.
शोभितासोबत लग्न केल्यामुळे चर्चेत आलेल्या नागाचैतन्यच्या टॅटूने सध्या सर्वांचं लक्ष वेधलं आहे. नागाचैतन्यच्या हातावर एक मोर्स कोडमधील टॅटू आहे.नागाचैतन्यच्या या टॅटूचा नेमका अर्थ काय, हे शोधण्याचा प्रयत्न सध्या चाहते करत आहेत. या टॅटूचा अर्थ काय, हे खुद्द नागाचैतन्यने ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सांगितलं होतं.
नागाचैतन्यच्या हातावरील हा खास टॅटू त्याच्यी पहिली पत्नी समंथा रुत प्रभूशी संबंधित आहे. हा टॅटू समंथाची आठवण आहे.नागाचैतन्यने एका या टॅटूबद्दल खुलासा करताना सांगितलं होतं की, या टॅटूचा अर्थ समंथा आणि नागाचैतन्यच्या लग्नाची तारीख आहे. समंथासोबत घटस्फोटानंतरही नागाचैतन्यने हा टॅटू हटवलेला नाही.
जेव्हा नागाचैतन्यला विचारण्यात आलं की, समंथासोबत त्याचा घटस्फोट झाला आहे, त्यामुळे तो टॅटू बदलणार का? यावर तो हसत हसत म्हणाला, ‘मी अजून याबाबत विचार केलेला नाही. त्यात बदल करण्याची गरज नाही. सध्या जसं आहे, तसं ठीक आहे.नागाचैतन्यवर तिचे प्रेम व्यक्त करताना, समंथाने तिच्या कमरेच्या वर एक अनोखा टॅटू बनवला होता.
‘Chay’ हे नागाचैतन्यचे टोपणनाव आहे. नागाचैतन्य आणि समंथाचे हे खास टॅटू त्यांच्या प्रेमाचे प्रतीक बनले होते. पण, घटस्फोटानंतर नागाचैतन्य आणि समंथा दोघांनीही टॅटू हटवलेले नाहीत. नागा आणि समंथा यांच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना तिच्या टॅटूबद्दल खंत व्यक्त केली. ‘कधीही टॅटू काढू नका’ असा सल्ला ती तरुणांना दिला होता. यानंतर समंथा नागाचैतन्यच्या टॅटमुळे चिंतेत असल्याचं स्पष्ट झालं होतं.
नागाचैतन्य आणि समंथाने 2017 मध्ये लग्न केलं होतं. त्यांनी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने अशा दोन पद्धतीने लग्न केलं होतं, पण त्यांचे नाते फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या चार वर्षानंतर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाची कारणे अद्याप एक रहस्य आहेत. नागा चैतन्यने काही दिवसांपूर्वी शोभिता धुलीपालाशी लग्न करून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.