रस्त्यावरील चिकन हातगाड्यांवर कारवाईची मागणी!

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. इचलकरंजीला महानगरपालिकेचा दर्जा देखील देण्यात आलेला आहे. परंतु असे काही प्रश्न आहेत जे नागरिकांना खूपच त्रास देत आहेत.

म्हणजेच इचलकरंजी रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी जास्त होतच चाललेली आहे. तसेच भटक्या कुत्र्यांचा उन्माद देखील वाढलेला आहे. भटकी कुत्री आपला घोळका करून उभी राहतात. त्यामुळे वाहनधारकांना अगदी जीव मोठीत धरून वाहन चालवण्याची वेळ आलेली आहे. त्याचबरोबर लहान मोठे अपघात देखील होत आहेत. त्यामुळे या चिकन गाड्यावर महापालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.