महापालिकेच्या वतीने चारही स्मशानभूमींत मोफत अंत्यसंस्कार केले जातात. शेणींचा तुटवडा असल्याने अंत्यसंस्कारासाठी लाकडाबरोबर शेणीही कमी वापरण्यात येत आहेत. त्यातूनच ही घटना घडल्याचे सांगण्यात येते.
पंचगंगा स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाचा भटक्या कुत्र्याने चक्क चितेतून हात पळवून काही अंतरावर नेऊन टाकला. हिंदू युवा प्रतिष्ठानचे अशोक देसाई यांनी हा प्रकार उघडकीस आणला.
मृतदेहाची विटंबना झाल्याने स्मशानभूमीत आलेल्या नागरिकांतून घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.
देसाई यांनी कर्मचार्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता त्यांनी अर्धवट जळालेला तो हात दुसर्याच मृतदेहाच्या चितेत टाकला. त्यामुळे देसाई यांनी त्या कर्मचार्याला खडेबोल सुनावले. दरम्यान, शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.