इचलकरंजीत गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम….

इचलकरंजी शहरात अनेक कार्यक्रम अगदी उत्सहात साजरे केले जातात. यामध्ये नागरिकांचा सहभाग देखील खूपच पहायला मिळतो. श्री गणेश जयंतीनिमित्त पंचगंगा नदी किनाऱ्यावरील श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ यांच्यावतीने मंगळवार ता. ६ फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार ता. ६ रोजी सकाळी ८ वा. १५ मिनिटांनी माजी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांच्या हस्ते व बाळासाहेब जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्सवमूर्तीचे पुजन, दिपप्रज्वलन व ज्ञानेश्वरी पारायण शुभारंभ होणार आहे.

गणेश जयंती निमित्त मंगळवार ता. ६ ते सोमवार ता. १२ पर्यंत सकाळी ८.१५ते ११ वाजेपर्यंत ह.भ.प. सदशिव दुंडाप्पा उपासे महाराज यांचे सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण तर दुपारी ४ ते ६ या वेळेत विविध भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम. मंगळवार ता. १३ रोजी सकाळी ८.३० ते ९.३० वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी साडेआठ वाजता ‘श्रीं’ ची सहस्त्रावर्तने, सकाळी १० ते १ वाजेपर्यंत मारवाडी युवा मंच मिड टाऊन यांच्यावतीने आरोग्य तपासणी शिबीर, सकाळी १०.१५ मिनिटांनी सौ. रेवती हणमसागर यांचे गणेश जन्माचे प्रवचन, दुपारी १२.०५ मिनिटांनी ‘श्रीं’चा जन्मकाळ व प्रसाद वाटप, सायंकाळी ५ वाजता भजन, सायंकाळी साडेसहा वाजता दिपोत्सव, सायंकाळी ७ वाजता महाआरती तर बुधवार ता. १४ रोजी दुपारी ११ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.