मंगळवेढा-सांगोला या राष्ट्रीय महामार्गावर लेंडवे चिंचाळे हद्दीतील ज्ञानेश्वरी लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसाय ठिकाणी सोलापूर पोलिस अधिक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक पथकाने छापा टाकून एका पिडीतेची सुटका करून लॉज मालक अविनाश येडगे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवेढा – सांगोला राष्ट्रीय महामार्गालगत लेंडवे चिंचाळे हद्दीत ज्ञानेश्वरी लॉजवर मालक तथा आरोपी अविनाश येडगे हा व्यवसायाकरीता महिला आणूनत्यांना वेश्या व्यवसाय करण्याकरीता भाग पाडत असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक पथकाचे प्रमुख पोलिस निरिक्षक बजरंग साळुंखे यांना समजताच त्यांनी दुपारी २.२० वा. पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
सदर पथकाने एक बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायाची खातरजमा करण्यात आली. यावेळी आरोपी हा बाहेरच्या राज्यातील महिला आणून वेश्या व्यवसाय करण्यास त्यांना भाग पाडत असल्याची माहिती स्पष्ट झाली.