चेन स्नॅचिंग करणारा सराईत चोरटा जेरबंद

चलकरंजी,  पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत चोरट्यास गावभाग पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने श्रीरामपूर येथून अटक केली आहे. निखिल सुभाष जगधने (वय २१ रा. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून इचलकरंजीसह जयसिंगपूर, कोल्हापूर व इस्लामपूर येथील ४ गुन्हे उघडकिस आले आहेत. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली असून त्याचा साथीदार राजेंद्र उर्फ पप्पू भीमा चव्हाण (वय २१ रा. टाकळीमान ता. श्रीरामपूर) हा सोलापूर पोलिसांच्या आहे. 


१७ एप्रिल रोजी सोलगे मळा परिसरातील वृषाली शशिकांत जाधव या सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास मुलीला क्लासला सोडून दुचाकीवरून घरी परतत असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गाडीच्या आडवे थांबत पत्ता विचारू लागले. त्याचवेळी एकाने जाधव यांच्या गळ्यातील मिनी मंगळसूत्र हिसडा मारून तोडण्याचा प्रयत्न करत हाती आलेला तुकडा घेऊन दोघांनी पलायन केले होते. या प्रकरणी गावभाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरु असताना इचलकरंजीतील गुन्ह्यातील मोटरसायकल चालविणारा सराईत चोरटा राजेंद्र चव्हाण याला सोलापूर पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केल्याचे तर निखिल जगधने फरार असल्याची माहिती समोर आली. तर जगधने हा श्रीरामपूर परिसरात येणार असल्याचे समजल्यानंतर गावभाग पोलीस ठाण्यातील एक पथक रवाना शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. झाले होते. या पथकाने जगधने याचा कोल्हापूर व इस्लामपूर येथे चेन स्नॅचिंग त्याने पप्पूच्या साथीने जयसिंगपूर, केल्याची कबुली दिली आहे. तर जगधने याच्यावर मनमाड रेल्वे व श्रीरामपूर पोलिसांत तीन गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत वाघमारे, अनिल पाटील, अमर शिरढोणे यांनी केली.