शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा आणि आनंददायी व प्रेरणादायी वातावरण तयार व्हावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे.या उपक्रमाअंतर्गत सलगर बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत लोकवर्गणीतून सजावटी केल्या गेल्या आहेत. त्यामुळे शाळेचे रुपडे बदलले आहे.
पण शैक्षणिक गुणवत्तेत या शाळेचे योगदान खूप कमी आहे. त्यामुळे वरवरच्या सजावटी करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या आत्मज्ञानात किती भर पडतेय हे पाहणे गरजेचे आहे.सलगर बुद्रुक येथील जे पहिली ते चौथीच्या वर्गात शिकणारे बरेच विध्यार्थी शेजारील सांगली जिल्ह्यातील उमदी गावच्या कोडगवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेत भाड्याने गाडी करून जातात.
त्यामुळे गावात झेडपीची शाळा असताना देखील गाड्या भरून विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यात शिक्षणासाठी जात असतील तर ती सोलापूर झेडपीच्या शिक्षण विभागाचे अपयश आहे असे गावातील सुज्ञ नागरिकांना वाटते. आणि दरवर्षी सांगली जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ होत आहे.