यंदा सोलापुरात गड्डा यात्रा ही 13 जानेवारीला चालू होणार आहे. 14 जानेवारीला यात्रेचा मुख्य सोहळा म्हणजेच मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यास लाखो भाविकांची उपस्थिती असते. हजारो भावीक जिथे एकत्र येतात तिथे काही ना काही दुर्घटना होण्याची भीती ही असतेच.
तर हाच मुद्दा विचारात घेऊन श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने यात्रेत येणाऱ्या भाविकांचा एक कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. जर यात्रेत काही दुर्घटना झाल्यास चेंगराचेंगरी झाल्यास त्यात मृत पावलेल्या भाविकांच्या वारसदारास एक लाख रुपयांची नुकसान भरपाई तर जखमी झालेल्यांना उपचारासाठी दहा हजार रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे.
श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने भाविकांचा एक कोटी रुपयांचा विमा उतरविला असून 10 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत यात्रेत काही अनुचित घटना घडल्यानंतर मृत आणि जखमी भाविकांना याचा लाभ होणार आहे.