बुमराहने मोडला मिचेल स्टार्कचा रेकॉर्ड…

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने आपला भेदक अंदाज दाखवून दिला आहे. महत्त्वाच्या तीन खेळाडूंना बाद करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं आहे. जसप्रीत बुमराहने जो रुटला बाद करताच एक विक्रम प्रस्थापित केला आहे.जो रुट एकदा का खेळपट्टीवर टिकला की भल्याभल्यांची वाट लावून टाकतो. त्यामुळे त्याला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आऊट करण्याचा प्रयत्न असतो. पण मागच्या तीन डावात त्याची बॅट हवी तशी तळपली नाही

जसप्रीत बुमराह अवघ्या 5 धावांवर असताना जसप्रीत बुमराहने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. शुबमन गिलने त्याचा अप्रतिम झेल घेतला आणि जसप्रीत बुमराहच्या नावावर एक रेकॉर्ड नोंदवला गेला.जो रुटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 वेळा बाद करण्याची किमया जसप्रीत बुमराहने साध्य केली आहे. यासह ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्क याला मागे सोडलं आहे. मिचेल स्टार्कने जो रुटला 11 वेळा आऊट केलं आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॅट कमिन्सनने जो रुटला सर्वाधिक वेळा बाद केलं आहे. तर जोस हेझलवूडने 13 वेळा बाद केला आहे. तर ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहने 12 वेळा जो रुटला बाद केलं आहे