गणपत गायकवाड यांना इतक्या दिवसांची पोलीस कोठडी!

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरण चांगलंच भोवलं आहे. उल्हासनगर कोर्टाने गणपत गायकवाड यांना 14 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हणजे गायकवाड यांना 11 दिवस पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे. पोलिसांनी गायकवाड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.

प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्याची चौकशी करायची आहे. गायकवाड यांच्या आवाजाचे नमुनेही घ्यायचे आहेत, त्यामुळे 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. पण कोर्टाने गायकवाड यांना 14 तारखेपर्यंतची कोठडी सुनावली आहे.गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांना आज उल्हासनगर कोर्टात हजर करण्यात आलं.

यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी न्यायाधीश ए ए निकम यांच्यासमोर जोरदार युक्तिवाद केला. यामध्ये फक्त राजकीय वैमनस्याचा प्रश्न नाहीये तर जमिनीचा आणि पैशांचा विषय आहे.यासाठी सखोल तपास होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.