नोटीस मागे घ्या अन्यथा…..

वस्त्रनगरी म्हणून इचलकरंजी नावारूपास आहे. अनेक बाहेरगावातील लोक नोकरीसाठी येथे येऊन स्थायिक झालेले आहेत. परंतु अलीकडच्या काळात यंत्रमाग धारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सायझिंग असोसिएशन ने सर्व सायझिंगधारकांच्या वतीने क्लोजर नोटीस मागे घ्या अन्यथा सायझिंग उद्योग बंद ठेवण्यात येतील असे प्रदूषण नियंत्रण मंडळास निवेदन देण्यात आले. शहर परिसरातील सायझिंगधारकांना गेल्या सहा महिन्यापासून नोटीसा काढून बायोडायजेस्टर बसवण्यासंदर्भात सुचना करीत आहेत. किरकोळ चुकांचे भांडवल करून प्रदुषण मंडळ सायझिंगना क्लोजर नोटीस काढत आहेत.

सायझिंग उद्योगातून ५०० ते १००० लिटर इतका कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो. तर कोट्यवधी लिटर पाण्याचा विसर्ग होत असलेल्यांकडे दुर्लक्ष होत आहे. क्लोजर नोटीस देताना कोणतीही प्रत्यक्ष भेट न देता व कायद्याप्रमाणे पाण्याचा नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवणे आवश्यक असून त्यानंतर संबंधित उद्योगांना कळविले पाहिजे. तसेच शहरातील विविध सायझिंग उद्योगांनी नुतनीकरणासाठी अर्ज केला आहे. मात्र, प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून दाखला मिळत नाही. या संदर्भात सायझिंगधारकांनी अर्ज केला नसेल तर त्यांना दंड करणे उचित आहे. परंतू प्रदुषण नियंत्रणाकडून दंड भरला नाही म्हणून क्लोजरच्या नोटीसा काढल्या जात आहेत.

या पार्श्वभुमीवर सायझिंग असोसिएशनच्या संचालक मंडळाने प्रदूषण मंडळ चे उपविभागीय अधिकारी श्री. माने यांनी निवेदन देण्यात आले. सायझिंगधारकांनी कोणतीही कारवाई केलेस आम्ही सायझिंग चालु करणार नाही अशी मागणी लावुन धरली. अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी कोणतीही सायझिंग बंद केलेस सर्व सायझिंग बंद ठेवण्यात येतील असे सांगितले. तसेच या संदर्भात खासदार, आमदार यांना भेटणार असल्याचेही सांगितले.