इचलकरंजीत पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. तसेच शहरातील नलिकेला सतत गळती लागल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागते. सुळकुड पाणी योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसंदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी ९ फेब्रुवारीला दुपारी चार वाजता समाजवादी प्रबोधिनी येथे शहरातील सर्वच राजकीय पक्ष व संघटनांची बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती सुळकूड पाणी योजना कृती समितीच्यावतीने देण्यात आली.
हा लढा तीव्र करण्यासाठी नुकतीच कृती समितीची बैठक झाली या बैठकीमध्ये प्रताप होगाडे, शशांक बावचकर, मदन कारंडे, राहुल खंजिरे सयाजी चव्हाण, सागर चाळके- पुंडलिक जाधव, सदा मलाबादे, सुनील बारवाडे, विकास चौगुले, दत्ता माने आदींसह पदाधिकारी उपस्थित होते आंदोलनामध्ये लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी व्यापक मेळाव करण्याचे ठरले.