श्री गणपती महायज्ञ सोहळ्याला प्रारंभ झाला. फुलांनी सजवलेला रथ, सवाद्य निघालेल्या या कलश यात्रेत डोक्यावर कळस घेऊन हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. लाल, भगव्या रंगाच्या एकसारख्या साड्या परिधान केलेल्या महिलांचा सहभाग कलश यात्रेत लक्षवेधी ठरला. लक्ष्मीनारायण मंदिर झेंडा चौक श्री पंचगंगा विनायक मंदिर तीन किमी प्रमुख मार्गावर धार्मिक
वातावरणात यात्रा काढण्यात आली.
पंचगंगा नदीकाठी महाराष्ट्रात प्रथमच होणारा भव्य १०८ गणपती महायज्ञ सोहळा आयोजित केला आहे. धार्मिक कार्यक्रमाने परिपूर्ण महायज्ञ सोहळ्याची सुरुवात भव्य कलश यात्रेने झाली. फुलांनी सजवलेल्या रथात श्री श्री १०८ सितारामदासजी महाराज, यज्ञाचार्य पंडित चिरंजीवजी शास्त्री, पंडित अक्षयजी गौड, संवित कैलाशचंद्र जोशी महाराज विराजमान झाले. जागोजागी नागरिकांनी यात्रेवर फुलांचा वर्षाव करत स्वागत केले.
राज्यभरातून अनेक संत महंतही भगवी वस्त्रे परिधान करून या यात्रेत सहभागी झाले होते. श्री पंचगंगा वरद विनायक मंदिर
परिसरात कलश यात्रेचा समारोप झाला. यात्रा मार्गावर स्वयंसेवकांनी स्वच्छतेबाबत खास दक्षता घेतली. यात्रेत अशोक स्वामी, बाळासाहेब जांभळे, द्वारकादास सारडा, गोविंद बजाज, रामदेव राठी, मिश्रीलाल बजाज, हेमाराम प्रजापत, गोविंद सोनी, श्याम काबरा, हनमंत वाळवेकर, शिवबसू खोत, विनायक रेडेकर, शितल पाटील, प्रशांत चाळके, बाळकृष्ण मिठारी, दिलीप मुथा, सुनील तोडकर, विश्वनाथ मेटे, उमाकांत दाभोळे आदींसह भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..