इच्छुक उमेदवारांवर खर्चाचा वाढला ताण….

विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच मतदारसंघांत इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी तसेच कार्यकर्त्यांची
टीम वाढविण्यावर भर दिला होता. परंतु आता निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्यामुळे वेळ वाढला आहे. उमेदवारांच्या खर्चावर ताण पडणार आहे. लांबलेले दिवस व कार्यकर्त्यांची मर्जी राखण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आता नेत्यांना उमेदवारी मिळविण्याचे नव्हे, तर खर्चाचे टेन्शन आले असावे, अशी चर्चा एका पक्षाच्या कार्यालयात नेत्यांमध्ये रंगली होती.