लोकसभेची आचारसंहिता लागण्याआधी…….

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कोल्हापूर शहराच्या सर्व प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी आणि क्रिडाई कोल्हापूरच्या सदस्यांची बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.क्रिडाईच्या वतीने आयोजित दालन 2024 चे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. त्यानंतर ते बोलत होते.

सामंत म्हणाले, कोल्हापूर क्रिडाईच्या सर्व मागण्या मार्गी लागल्या पाहिजेत, अशी आमचीही भूमिका आहे, कोल्हापूर शहराचा ऐतिहासिक वारसा, इथल्या निसर्गाचे संवर्धन, पंचगंगा नदीचे संरक्षण हे विषय मुख्यमंत्र्यांच्याही प्राधान्यक्रमाचे विषय आहेत. पंचगंगा नदीचा प्रश्न पुढची 50 वर्षे मार्गी लावण्यासाठी गाळ काढण्याच्या कामाचा डीपीआर तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नुकतेच दिले आहेत.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, क्रिडाईचे अध्यक्ष के. पी. खोत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, क्रिडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राजेंद्र यादव, क्रिडाईचे उपाध्यक्ष सचिन ओसवाल, गौतम परमार, दालनचे चेअरमन चेतन वसा, अजय डोईजड, संदीप मिरजकर आदी यावेळी उपस्थित होते.