मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

आज प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांनी संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागलमध्ये प्रचार सभा आज घेतली. धनुष्यबाणाचे बटन दाबून उद्धव ठाकरेंचा टांगा पलटी करायचा आहे. ठाकरेंची मशाल चिलीम होणार आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला आहे. कोल्हापूर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.