सकाळपासूनच मतदानासाठी रांगाच रांगा……

पहिल्या दोन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षित मतदानाचा अंदाज न आल्याने तिसऱ्या टप्प्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून झंझावती प्रचार करण्यात आला आहे.लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे.कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये आज मतदान होत आहे.

सकाळपासून कोल्हापुरात मतदानासाठी रांगा लागल्या आहेत.कोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराज यांनीही मतदानाचा हक्क बजावला.स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनीही मतदानाचा हक्क बजावला.अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून मतदानासाठी रांगा लावल्या आहेत.कोल्हापुरात शाहू महाराज मतदानासाठी आल्यानंतर लोकांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.

कोल्हापुरात शाहू महाराज आणि संजय मंडलिक अशी थेट लढत होत आहे.कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये सरासरी 70 टक्के मतदान होत आलं आहे.त्यामुळे यावेळी सुद्धा तोच आकडा गाठण्यासाठी कोल्हापुरात शर्थीचे प्रयत्न असणार आहेत.