थर्टी फर्स्ट साठी कोल्हापुरात मटणाच्या दुकानात गर्दीच गर्दी

थर्टी फर्स्टसाठी कोल्हापुरात मटन खरेदीसाठी गर्दीच गर्दी! कोल्हापूरकरांसाठी थर्टी फर्स्ट आणि रविवार असा दुहेरी योग आला आहे. यामुळे कोल्हापुरात मटन खरेदीसाठी गर्दी झाली आहे. चिकन मटन मार्केटसह फिश मार्केट ही हाउसफुल झाले आहे. आज मटणाचे दर 680 रुपयांवर आहे.

थर्टी फर्स्टच्या निमित्ताने तांबडा पांढरा रस्यावर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहे. नागपूरमध्ये चिकन, मटणच्या दुकानात गर्दी दिसून येत आहे. पुण्यात सकाळपासून मटन खरेदीसाठी गर्दी झाली आहे. पुण्यात मटन चिकनच्या दुकानात बाहेर पुणेकरांच्या रांगा लागल्या आहेत.