शिवाजी विद्यापीठाच्या सांगली उपकेंद्रासाठी जागेची पाहणी चालू होती. अनेक तर्क वितर्क देखील येत होते. अखेरीस खानापुरातील जागेचा शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी ठराव मंजूर झालेला आहे. शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राच्या खानापुरातील जागेचा ठराव व्यवस्थापन सल्लागार समितीत मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सदस्य वैभव पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने प्राचार्य डॉ. व्ही. एम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या दहा सदस्यांच्या समितीने ९ जानेवारी रोजी खानापुरात येऊन संबंधित जागेची पाहणी केली होती.
या जागेची पाहणी केल्यानंतर असे निदर्शनास आले आहे की, खानापूर येथील गट नंबर ५७२/१, ५७२/२ व गट नंबर ५८८ हे सर्व गट एकत्र करून सलग मिळाल्यास जागा शिवाजी विद्यापीठाच्या सांगली उपकेंद्रासाठी योग्य होऊ शकते.. समितीने जागा पाहणीचा अहवाल शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन सल्लागार समितीमध्ये ठेवल्यानंतर खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र जागेसाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.