प्राथमिक शाळा नऊ वाजेनंतर भरवण्याच्या निर्णयाला…….

पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा सकाळी नऊच्या नंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूलबस मालकांनी विरोध दर्शवला आहे. शिक्षण विभागाने चर्चा न करता मार्ग काढल्याने निर्णयाची अंमलबजावणी करताना अडचण होत असल्याचं स्कूलबस मालकांचं (School Bus Owners) म्हणणं आहे. सरकारने निर्णयावर फेरविचार न केल्यास आणि स्कूल बस मालकांना सक्ती केल्यास भ़ाडे वाढ करण्याचा इशारा स्कूलबस मालकांनी दिला आहे. स्कूलबसचे भाडे 25 ते 40 टक्क्यांनी वाढवणार, असा इशारा स्कूल बस मालकांनी राज्य सरकारला दिला आहे. पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंत शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरवण्याच्या शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मात्र, या निर्णयाला स्कूल बस मालक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. शाळा व्यवस्थापन आणि स्कूल बस मालकांशी कुठल्याही प्रकारे चर्चा न करता हा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून  घेण्यात आल्याचा  स्कूल बस मालकांचे म्हणणं आहे. सकाळी नऊ वाजता जर शाळा भरत असेल  तर, मुंबईत गर्दीच्या वेळी म्हणजेच पीक आवरमध्ये  स्कूल बसला फेऱ्या माराव्या लागणार आहेत, ही मोठी अडचण असल्याचं स्कूलबस मालकांचं म्हणणं आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी आणि रस्त्याची स्थिती याची जाणीव राज्य सरकारला आहे.

शिवाय प्राथमिक शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरवल्यास दोन शिफ्टचे व्यवस्थापन  स्कूलबस मालकांना शक्य होणार नाहीत. यामुळे स्कूलबस एकूण आठ फेऱ्या गर्दीच्या वेळी माराव्या  लागणार आहेत. यामध्ये  कार्यालयीन कर्मचाऱ्याची जाण्याची आणि येण्याची वेळ असल्याने या गर्दीत विद्यार्थ्यांना ने-आण  करणे, हे अधिक अडचणीचे होणार असून  यामध्ये अधिकचा वेळ लागणार आहे.