मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जालन्यातील (Jalana) अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरु आहे. सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसागणिक खालवत आहे.
पण, बुधवारी जरांगे यांची तब्येत खालावली त्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आली, मात्र जरांगेनी सलाईन काढून टाकली. जरांगेंच्या उपोषणस्थळी मोठ्या संख्येन नागरिक जमा झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मागणी पूर्ण झाली नाही, तर मुंबईत पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही जरांगेंनी दिला आहे.
सरकार आता जरांगेंच्या उपोषणात मध्यस्थी करणार की जरांगे पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करणार हे पाहावं लागेल. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, सरकारच्या उरावर बसून अंमलबजावणी घेणार आणि तसं नाही झालं तर, उपोषण करतच मुंबईतच घुसणार, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.