राष्ट्रवादी अजितदादांचीच! शरद पवार यांना मोठा धक्का….

 राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर निर्णय देण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रवादी पक्ष कुणाचा हे स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी मोठं विधान केलं आहे. आमदारांच्या संख्याबळावरच पक्ष कुणाचा यावर निर्णय देणार असल्याचं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच शरद पवार हे कधीपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते? तसेच राष्ट्रवादीत कधी दोन गट पडले? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं आहे. तसेच राष्ट्रवादी हा पक्ष अजितदादा यांचाच असल्याचा ऐतिहासिक निकालही राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी काही गोष्टींवर भाष्य केलं. या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र राष्ट्रवादीत दोन गट तयार झालेले आहेत.

प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे, असं सांगतानाच जून 2023 पर्यंत शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. त्यापूर्वी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामाही मागे घेतला होता, असं राहुल नार्वेकर यांननी म्हटलं आहे. अजित पवार गट मूळ राजकीय पक्ष आहे. संख्याबळाच्या आणि पक्षीय संरचनेच्या दृष्टीने अजितदादा यांचा पक्षच मूळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.