एसटीचा प्रवास आता..

राज्यात ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात सर्वात विश्वासार्ह वाहतूक म्हणून एसटीची ओळख आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसने रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. एसटीने विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांसाठी सवलत योजनाही आणल्या आहेत. नुकतेच सर्व गटातील महिलांसाठी बस तिकिटांवर 50 टक्के सवलत योजना सुरू केली. या योजनेला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

आता परिवहन महामंडळाने सहा महिने मोफत प्रवासाची योजना आणली आहे. ही योजना एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वयाच्या ७५ वर्षांपर्यंत, तर मृत कर्मचाऱ्यांच्या पत्नीला ६५ वर्षांपर्यंत सहा महिने घेता येणार आहे. म्हणजेच त्यांना सहा महिने मोफत एसटी प्रवास करता येणार आहे. महामंडळाचे महाव्यवस्थापक मोहनदास भरसट यांनी यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.