राष्ट्रवादीमधील ठराव भाजपला परवडणार का ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार रायगड जिल्ह्यात होते. यावेळी त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेत कार्यकर्त्यांना संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मेळाव्यात विविध ठराव मांडण्यात आले. ठरावाच्या माध्यमातून अजित पवार यांचे अभिनंदन करण्यात आले. अल्पसंख्यांकांना विशेष आरक्षण दिले जावे, त्यासाठी जातनिहाय जनगणना व्हावी, असा ठराव यावेळी झाला. जातनिहाय जनगणनासंदर्भात भाजपशी विरोधी भूमिका यावेळी घेण्यात आली. त्यामुळे अजित पवार यांच्या या मेळाव्यातील ठरावास भाजपचे समर्थन मिळणार की विरोध होणार? यावर चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्ष आणि पक्षाचे चिन्ह मिळाल्याबद्दल त्यांचा अभिनंदन करण्याचा ठराव करण्यात आला. अब्दुल कलाम शिष्यवृत्ती वाढवून १००० कोटी केल्याबद्दल अजित पवार यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच महिला बचत गटांना आता तारण ठेवावे लागणार नाही. ती अट काढून टाकण्यात आली आहे. यासाठी अजित पवार यांचे अभिनंदन करण्याचा ठराव करण्यात आला.

अल्पसंख्यांकांच्या विशेष आरक्षण दिले जावे. त्यासाठी जातनिहाय जनगणना व्हावी, हा अधिवेशनातील ठराव कळीचा मुद्दा ठरणार आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपचा या दोन्ही विषयांना विरोध आहे. अल्पसंख्यांकांना नोकरी, शिक्षण राजकारणात आरक्षण मागणी राष्ट्रवादीच्या ठरावात करण्यात आली.