हातकणंगले पंचायत समितीची जुनी इमारत नगरपंचायतीस द्या

हातकणंगले नगरपंचायतीचा व्याप दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. शहराच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात औद्योगिक विस्तार होत आहे. त्यामुळे नगरपंचायत इमारतीत गर्दी वाढू लागली आहे. परंतु सध्याची गावाच्या मध्यभागी असलेली इमारत अपुरी पडत आहे. आणि पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. याचा विचार करून सांगली – कोल्हापूर रोडवरील पंचायत समितीची जुनी इमारत नगरपंचायतला मिळावी, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी आणि दादासो गोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. शुक्रवारी शासकीय विश्रामधामवर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देत याबाबत सविस्तर चर्चा केली. यावर मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकास विभागाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. अशी माहिती सागर पुजारी यांनी दिली.