छत्रपती शिवाजी महाराज यांची सोमवारी १९ रोजी जयंती. या जयंतीनिमित्त सांगलीसह जिल्हाभरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. शहरातील विविध मंडळांच्यावतीने यंदा विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात येणार असून,रक्तदान शिबिर, विविध स्पर्धा, शस्त्र प्रदर्शन, व्याख्यानांसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, स्पर्धांचे आयोजन केले आहे. शिवजयंती उत्साहात साजरी करा
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी शिवजयंती उत्साहात तसेच शांततामय वातावरणात साजरी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
ते म्हणाले, महाराजांचे राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरण आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहे. महाराजांच्या विचारांची समृध्द परंपरा व संस्कृती पुढे घेऊन जाणे आवश्यक आहे. सर्व नियमांचे पालन करून शांततामय वातावरणात साजरी करावी.