सांगलीत दगडफेक, महापालिकेच्या विराेधात रस्त्यावरील विक्रेते आक्रमक

 सांगलीत शनिवारी भरणाऱ्या बाजाराला बसण्यास बंदी घातल्यामुळे संतप्त विक्रेत्यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वाहनावर दगडफेक केली. यावेळ काहींनी अग्निशमन विभागाच्या वाहनाचा काचा फोडल्या. या घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दगड फेकणाऱ्यांवर कारवाई केली.

सांगली महापालिकेकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे एकत्रित दिवाळी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील रस्त्यावर बसून व्यवसाय व्यापार करणाऱ्या विक्रेत्यांना जागाही दिली जाणार आहे.

त्यामुळे आज (शनिवार) महापालिके समोरील मदन भाऊ संकुल या ठिकाणी बसणारा बाजार दिवाळी काळापुरता स्थलांतरित करण्याचे आदेश महापालिका प्रशासन काढले होते. याला विरोध करत आज येथील व्यवसायिकांनी घोषणाबाजी केली.

त्या ठिकाणी असणाऱ्या महापालिकेचे अग्निशमन गाडीवरच दगडफेक केली. यामध्ये अग्निशमन गाडीच्या काचा फोडण्यात आले. या घटनेमुळे सांगलीतील शनिवार बाजार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दगडफेक करणाऱ्याला ताब्यात घेतले.