इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाकडून घेण्या आलेल्या सी.ए. फाऊंडेशन परिक्षेत येथील डीकेटीईच्या कॉमर्स कॉलेजने यश संपादन केल या कॉलेजच्या स्वस्तिका सुतार, करण पुरोहित, ऋषिकेश दरी, आणि रौनक गुलेचा यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले. तसेच जयदीप वीर, विश्वजित केसरकर, सोहम गुरव, श्वेता माळी, तेजस कापसे, मोक्ष परिख, पियुष अग्रवाल, तनिष्का लिगाडे, तनुश्री माळी, श्रीश भोजे, यश मोरे, प्रतिक्षा खाडे, तन्मय माळकर, प्रियंका शर्मा, अपूर्वा लोंढे, अथर्व जमादार, विनम्र अग्रवाल आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा डीकेटीई संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्या कासार, श्री. खानाज उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक सौ. अग्निहोत्री यांनी केले. तर श्री. सावंत यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांना प्रा. विजय चौगुले, प्रा.एस.डी. पाटील, प्रा. सौ. जी. एस. अग्निहोत्री, प्रा. ए. एच. सावंत, सी.ए. चिराग मानधने व इतर सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
