इचलकरंजी येथील माजी उपनगराध्यक्ष रवी साहेबजी रजपूते यांचा २४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने वाढदिवस सप्ताह साजरा केला जाणार आहे. इचलकरंजी येथील माजी उपनगराध्यक्ष रवी साहेबजी रजपूते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १९ ते २५ फेब्रुवारी या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रवी रजपूते वाढदिवस गौरव समितीतर्फे ही माहीती दिली.
१९ फेब्रुवारीस शिवजयंती निमित्त किल्ला स्पर्धेचे बक्षिस वितरण केले जाणार आहे. प्रभाग १२ मध्ये २० फेब्रुवारीस इलेक्ट्रिक बोअर खुदाई केली जाणार आहे. आय.जी. एम. रुग्णालयात रूग्णांना २१ फेब्रुवारीस फळांचे वाटप केले जाणार आहे. वृध्दाश्रमातील वृध्दांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप २२ फेब्रुवारीस करण्यात येणार आहे. लहान मुलांना २३ फेब्रुवारीस लंच बॉक्स वितरीत केले जाणार आहे. तर रवी रजपूते यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजे २४ फेब्रुवारीस भव्य रक्तदान शिबीर आयोजले आहे. २५ फेब्रुवारीला आरोग्य शिबीराचे आयोजन आरोग्य केंद्र कामगारचाळ या ठिकाणी केले जाणार आहे.
दरम्यान, या वाढदिवसाचे औचीत्य लक्षात घेऊन २२ ते २५ फेब्रुवारी या तीन दिवसात तीन ठिकाणी स्वतंत्रपणे आधार कार्ड कॅम्प घेतला जाणार आहे. तर २३ व २५ फेब्रुवारीस अनुक्रमे शाहूनगर, भोणेमाळ, गाताडे ऑईल मिलसमोर तसेच रवी रजपूते जनसंपर्क कार्यालयासमोर आधार कार्ड कॅम्प घेण्यात येणार आहे. या तीन दिवसीय कॅपमध्ये आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक केले जाणार आहे. लहान मुलांचे आधारकार्ड नवीन आधारकार्ड नोंदणी, जन्म तारीख बदलणे, नावात बदल करणे, बंद आधारकार्ड पूर्ववत सुरू करणे आणि डॉक्यूमेंट अपडेट करणे आदी कामे केली जाणार आहेत, असे एका पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.